*जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी* *मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव” गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा […]
Month: September 2026
वक्फ नोंदणीच्या प्रकरणांसाठी आता विशेष बेंच वादग्रस्त नोंदींची वस्तुस्थिती तपासून जलद व एकसमान पद्धतीने निपटारा करण्याचा निर्णय
मुंबई : वक्फ नोंदणीसंदर्भातील प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वक्फ नोंदणीशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची तपासणी करून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली वक्फ प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करण्यात येणार आहे. या बेंचच्या माध्यमातून वादग्रस्त […]
मुलचेरा तालुक्यात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
मुलचेरा, दि. ९ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मुलचेरा तालुक्यातील सांस्कृतिक भवन परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. कार्यक्रमाला नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पारंपरिक वेशभूषेत नागरिक […]
निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात
गडचिरोली, दि. 7 (जिमाका) : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध निवृत्तीवेतनविषयक सेवा आता ‘महा-उपलब्धी’ या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली आणि जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक […]
खासगी हॉटेलचे परवाने रद्द, मग मंत्रालय कँटीनचे का नाही? FDA अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलं
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात एफडीएकडून (FDA) मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गुटखा, भेसळयुक्त पदार्थ, औषधे आणि हॉटेलमधील नियमभंगाच्या प्रकरणांवर आणि अस्वच्छतेवर एफडीएने कारवाईचा वेग वाढवला आहे. मात्र, याच कारवाईच्या पद्धतीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर एफडीएकडून करण्यात […]
सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची दानचोरी […]
देवाभाऊंचा डिजिटल शिक्षणाला बळ; ‘विनोबा डिजिटल अॅप’चा ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम; २५ जिल्ह्यांतील ४५ हजार शासकीय शाळा जोडल्या बातमी : मुंबई : राज्यातील शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला अधिक चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या **’विनोबा डिजिटल अॅप’**ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अॅपचा आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी […]
दुर्गा मंदिरासमोर रात्रीच्या वेळी मोकाट बैलांचा वावर; अपघाताचा धोका वाढला
मुलचेरा : मुलचेरा शहरातील दुर्गा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोकाट बैल व गायींचा कळप रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हेच बैल दिवसा देखील मुख्य चौकात आणि गजबजलेल्या रस्त्यांवर बसलेले दिसतात. विशेषतः रात्री प्रकाश […]
विश्वनाथनगर परिसरात चिखलात बस फसली प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र रोष कायमस्वरूपी उपाययोजना करा
गडचिरोली मुलचेरा: तालुक्यातील कोपरअल्ली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही पडताना दिसून येत आहे. सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस या मार्गावरील चिखलात रुतल्याने जवळपास ७० विद्यार्थी तब्बल तीन तास रस्त्यातच अडकून राहिले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमएच-१४ एलएक्स-६५६९ क्रमांकाची मानव […]
श्री सिद्धिविनायकाच्या दानपेटीतून १८ कोटींची चोरी? विश्वस्तांनाच संशय, एकनाथ शिंदेंना पत्र सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या दानपेटीतील रक्कम आणि आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळाने चौकशीची मागणी केली आहे.
मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या दानपेटीतील रकमेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंदिर ट्रस्टच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाला आणखी वेग आला तो मंदिर विश्वस्त मंडळाच्या काही […]










