गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंच्यात ‘श्री बद्रकाली टाईल्स’ या नवीन दुकानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

सिरोंचा, प्रतिनिधी : सिरोंचा येथील सागर रेड्डी कॉम्प्लेक्समध्ये ‘श्री बद्रकाली टाईल्स’ या नवीन दुकानाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. *या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक श्री. सतीश भोगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरसेवक श्री. रंजीत नागेश्वर गागापुरवार हे प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते*.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नवीन दुकानाची पाहणी करून संचालकांना व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘श्री बद्रकाली टाईल्स’ या दुकानामार्फत ग्राहकांना विविध प्रकारच्या दर्जेदार टाईल्स व बांधकाम साहित्य उपलब्ध होणार असून, स्थानिक नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, मित्रपरिवार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.