पोमकें येलचील हद्दीत चार विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध मोहफुलाची हातभट्टी नष्ट करत एकूण 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट
गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी पोमकें येलचिल येथील पोलीस पथकाने येलचिल हद्दीतील मौजा नवेगाव व मौजा वेलगुर टोला शेत शिवारात चार विविध ठिकाणी धाड टाकून अवैद्य हातभट्टी मोहफुलाच्या दारुची भट्टी चालविणाया तसेच साठवणूक करुन विक्री करणाया 04 आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी पोमकें येलचिल येथील पोलीस पथकाला गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, पोमके येलचिल हद्दीतील रहिवासी 1) मारोती लक्ष्मण मोहुर्ले, वय 35 वर्ष, रा. नवेगाव ता. अहेरी, जि. गडचिरोली 2) शंकर नागोराव सोनूले वय 38 वर्ष रा. नवेगाव ता. अहेरी जि. गडचिरोली 3) शंकर बिच्चु आत्राम वय 24 वर्ष, रा. नवेगाव ता. अहेरी जि. गडचिरोली 4) तिरुपती कनकय्या दुलम वय 40 वर्ष, रा. वेलगुर ता. अहेरी जि. गडचिरोली हे पोमकें येलचिल हद्दीतील मौजा नवेगाव व मौजा वेलगुर टोला शेत शिवार अशा वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मोहफुलाच्या सडव्याची साठवणूक करुन हातभट्टी मोहफुलाची दारु अवैधरित्या तयार करीत आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरुन पोमकें येलचिल येथील पोलीस पथकाने मौजा नवेगाव व वेलगुर टोला येथील शेतीच्या परिसरात पाहणी केली असता, चार विविध घटनास्थळांवर अवैध हातभट्टी दारु निर्मितीची भट्टी मिळून आली. यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर विविध ठिकाणांची पाहणी केली असता, घटनास्थळांवरुन एकूण 1) 08 निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये एकूण 800 लीटर मोहफुल सडवा एकूण किंमत अंदाजे 80,000/- रुपये, 2) 10 निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 1000 लिटर मोहफुल सडवा एकूण किंमत अंदाजे 1,00,000/- रुपये, 3) 10 निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 2000 लिटर मोहफुल सडवा एकूण किंमत अंदाजे 2,00,000/- रुपये, व 4) 16 निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 1600 लिटर मोहफुल सडवा एकूण किंमत अंदाजे 1,60,000/- रुपये असे एकूण 44 निळ्या रंगाचे ड्रम मध्ये 5,400 लिटर मोहफुल सडवा एकूण किंमत 5,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर विविध ठिकाणांवरील हातभट्टी साहित्य, तयार हातभट्टी दारु व प्लास्टीक ड्रममधील मोहफुलाचा सडवा नियमानूसार घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे अहेरी येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 274/2026, अप क्र. 275/2026, अप क्र. 276/2026, अप क्र. 277/2026 कलम 65 (फ) म.दा.का. अन्वये आरोपी नामे 1) नामे मारोती लक्ष्मण मोहुर्ले, वय 35 वर्ष, रा. नवेगाव ता. अहेरी, जि. गडचिरोली 2) शंकर नागोराव सोनूले वय 38 वर्ष रा. नवेगाव ता. अहेरी जि. गडचिरोली 3) शंकर बिच्चु आत्राम वय 24 वर्ष रा. नवेगाव ता. अहेरी जि. गडचिरोली 4) तिरुपती कनकय्या दुलम वय 40 वर्ष, रा. वेलगुर ता. अहेरी जि. गडचिरोली यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर चारही गुन्ह्रांच्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. हर्षवर्धन बि. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें येलचिलचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनाजी शिंदे, पोउपनि. अशोक बांगर, पोअं/गगुरी, पोअं/गावडे, पोअं/मंडलवार, पोअं/शेंडे यांनी पार पाडली.





