ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महसूल विभागामार्फत सेतू केंद्रातून नागरिकांना पारदर्शक सेवा; तहसीलदार चेतन पाटील यांची माहिती

महसूल विभागामार्फत सेतू केंद्रातून नागरिकांना पारदर्शक सेवा; तहसीलदार चेतन पाटील यांची माहिती

मुलचेरा | वृत्तसेवा

महसूल विभागाच्या वतीने सेतू केंद्रामार्फत नागरिकांना पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली.

ते म्हणाले की, शासनाच्या विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा सेतू केंद्राच्या माध्यमातून निश्चित कालमर्यादेत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही दलालांवर अवलंबून न राहता थेट सेतू केंद्रात अर्ज सादर करून शासनाच्या ऑनलाइन व पारदर्शक सेवांचा लाभ घ्यावा.

महसूल विभाग नागरिकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेनुसार कार्यरत असून, प्रत्येक अर्जावर नियमानुसार आणि वेळेत कार्यवाही केली जात आहे. सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, तसेच कोणतीही अडचण असल्यास संबंधित महसूल अधिकारी किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार चेतन पाटील यांनी केले