युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

सिरोंचा : सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण तसेच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून करण्यात आली. यावेळी रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याचबरोबर नागरिक व वाहनचालकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता यावा, या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.
युवा नेते ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी असल्याचे सांगितले.
या उपक्रमात युवा नेते ऋतुराज हलगेकर मित्र परिवार नगरसेवक रंजित गागापुरवार , नगरसेवक इम्तियाज खान, विजय रंगुवार , सिद्दिक अली, सुरेश कंबागोनी, M.D शानु , सलाम सातार, समीर आरिगेला, इस्माईल शेख (दादा भाई) ,मयुर पुपलवार , संदीप गागापुरपू , विजय तोटा , सादिक भाई, संदीप घंटावर, सुजल कमलवार, राजेश बद्दी (चांटी सर ),साईकुमार घंटावर , सलमान शेख , स्वप्नील तोकाला, देवया येनगंदूला, समस्त कार्यकर्ते, मित्रमंडळ तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.





