ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांच्या १३ ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध; घरबसल्या अर्ज व पडताळणीची सुविधा


मुंबई,
महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांसाठी विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे पोलिस ठाण्यात वारंवार जाण्याची गरज कमी होऊन अनेक अर्ज, तक्रारी व पडताळणीची कामे घरबसल्या करता येणार आहेत.
या ऑनलाइन सेवांमध्ये ई-तक्रार नोंदणी, हरवलेल्या व्यक्तीची नोंद, हरवलेल्या वस्तू किंवा कागदपत्रांची नोंद, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC), भाडेकरू पडताळणी, घरगुती मदतनीस पडताळणी, कर्मचारी पडताळणी, कार्यक्रम/मिरवणूक परवानगी अर्ज, लाऊडस्पीकर परवानगी, शस्त्र परवाना, पासपोर्ट पडताळणीची स्थिती, ऑनलाइन अर्जाची स्थिती आणि एफआयआरची प्रत मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या सेवांमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होत असून, शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमतेलाही चालना मिळत आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
ऑनलाइन सेवा पोर्टल :
citizen.mahapolice.gov.in