पोमकें येलचील हद्दीत चार विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध मोहफुलाची हातभट्टी नष्ट करत एकूण 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन […]
Month: September 2026
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने घरफोडी व जबरी चोरीच्या 02 विविध गुन्ह्रांमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन दागिणे फिर्यादींना सुपुर्द
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे हस्ते एकूण 10,96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सुपूर्द सविस्तर वृत्त असे आहे की, पोस्टे गडचिरोली येथे दाखल असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्रांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करण्यात येऊन सदर गुन्ह्रातील मुद्देमालाचा शोध पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून घेण्यात आला आहे. पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने मालमत्तेविरुद्धच्या दोन गंभीर चोरीच्या गुन्ह्यांचा […]
राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’
राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर, २०२६ ते ३१ मार्च, २०२७ या कालावधीमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे […]
अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न
मुलचेरा:-भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा अंतर्गत मुलचेरा व बोलेपल्ली, जि. गडचिरोली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक […]
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजनेसाठी ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज
मुंबई : अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्जाची अंतिम मुदत ४ सप्टेंबर २०२६ अशी आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक अडचणींमुळे उच्च […]
गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
देशाचा गडचिरोलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला; ‘व्हिजन २०४७’मधून सर्वांगीण विकासावर भर गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात आहे. समृद्ध नैसर्गिक व खनिज संपदा, सुधारत असलेली दळणवळण व्यवस्था, औद्योगिक विकास, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून गडचिरोली महाराष्ट्रातील […]
सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उद्घाटन
कोल्हापूर : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उद्घाटन तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या 44 प्राथमिक आरोग्य व 74 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे. राज्यातील सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन […]
मातृ वंदन योजनेतून गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक आधार
मातृ वंदन योजनेतून गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक आधार पहिल्या अपत्यासाठी ₹5 हजार, तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास ₹6 हजारांचा लाभ; पात्र महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुलचेरा, जि. गडचिरोली : गर्भवती महिला व स्तनदा मातांना गर्भावस्था आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक आधार मिळावा, तसेच माता व बालकांचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने केंद्र शासनाची प्रधानमंत्री […]
महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार
महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळावा, या उद्देशाने महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महा-डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून […]
सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ
सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ मुलचेरा, जि. गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई गावात मोबाईल नेटवर्कअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांकडे मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे सिमकार्ड आहेत; मात्र गावात पुरेसा मोबाईल सिग्नल उपलब्ध नसल्याने साधा फोन करण्यासाठीही नागरिकांना […]










