ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वीच, दुष्काळाचा ‘जीआर’ आज काढणार; शेतातच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढलेल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. आज, शुक्रवारी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. वाशीम जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. यानंतर ते अमरावतीच्या बेलोरा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. २५ : विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे  पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*भामरागड तालुक्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य व वनहक्कांचे प्रश्न तातडीने सोडवा!*

होडरी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामसभांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन भामरागड, २२ सप्टेंबर: भामरागड तालुक्यातील गोपनार, हालोडंडी, मोराडपार, लष्कर, होडरी तसेच परिसरातील गावांमध्ये रस्ते, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, सिंचन, वनहक्क आणि ग्रामसभा सक्षमीकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या गंभीर प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कालबद्ध पद्धतीने (Time-bound) ठोस […]