मुंबई, दि. १३ : महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्यातून मिळालेले विचार अंगीकारण्याचे आवाहन मंत्री लोढा यांनी यावेळी केले. श्रीचक्रधर स्वामी यांनी तत्कालीन समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, विषमता, […]
विदर्भ
आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १३ : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंधासंदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, अशा सर्व प्रकल्पांना राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले […]
भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात
नागपूर, दि. १३ : भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील […]
प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे राज्यपालांकडून स्वागत पर्यावरण संवर्धन व सूक्ष्म वन निर्मितीसाठी विद्यापीठांशी सहकार्य करणार असल्याची माहिती
मुंबई, दि. १३ : शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे ५० वे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे स्वागत केले. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने हजारो ठिकाणी ‘सूक्ष्म वन’ (Micro Forest) उभारण्याचे उपक्रम हाती घेतले असून, महाराष्ट्रातील विद्यापीठे व […]
*‘जगन्नाथ पुरी रथयात्रे’ने जिंकले मन; अहेरीतील तान्हा पोळा नंदी सजावट स्पर्धेत सक्षम मुधोळकर प्रथम*
अहेरी: येथील कन्यका परमेश्वरी मंदिरात तान्हा पोळा कृती समितीच्या वतीने तान्हा पोळानिमित्त नंदी व नंदीधारक सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या स्पर्धेला स्थानिक बालगोपालांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांनी एकापेक्षा एक सुंदर संकल्पना मांडून उपस्थितांची मने जिंकली. हे ठरले स्पर्धेचे विजेते: * प्रथम क्रमांक: सक्षम प्रतिक मुधोळकर – (संकल्पना: ‘जगन्नाथ पुरी […]
*सिरोंचात ‘तान्हा पोळा २०२६’ उत्साहात संपन्न; उडान फाउंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम*
सिरोंचा: येथील उडान फाउंडेशनतर्फे “पारंपरिक शेतकरी व ग्रामसंस्कृती” या संकल्पनेवर (थीम) आधारित ‘तान्हा पोळा २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समृद्ध संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवण्यात आले. चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग: या अनोख्या महोत्सवात १ ते १२ वर्षे वयोगटातील लहान मुला-मुलींनी अतिशय उत्साहाने भाग घेतला. लहानग्यांनी नंदीबैलांची केलेली आकर्षक […]
*गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा; पोलिसांचे आवाहन*
सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्या, नियमांचे पालन करा; गणेश मंडळांना पोलिसांचे मार्गदर्शन सिरोंचा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक व प्रशासनाने परस्पर सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय […]
‘सेवा संकल्प अभियान’ला १७ सप्टेंबरपासून सुरुवात प्रत्येक गावात सेवा उपक्रम; युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन
‘सेवा संकल्प अभियान’ला १७ सप्टेंबरपासून सुरुवात प्रत्येक गावात सेवा उपक्रम; युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार असून, नागरिकांनी विविध सामाजिक व जनसेवा उपक्रमांमध्ये […]
अडपल्ली चेक गावात टॉवरअभावी नेटवर्कसाठी नागरिकांची भटकंती! मोबाईल असूनही नसल्यासारखी अवस्था; Android मोबाईल ठरले शोभेची वस्तू
अडपल्ली चेक गावात टॉवरअभावी नेटवर्कसाठी नागरिकांची भटकंती! मोबाईल असूनही नसल्यासारखी अवस्था; Android मोबाईल ठरले शोभेची वस्तू शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळत नसल्याने नागरिक वंचित; विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच फटका अडपल्ली चेक | प्रतिनिधी डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक साधन बनले असताना, मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चेक गावातील नागरिक मात्र आजही मोबाईल नेटवर्कच्या […]
*महाराष्ट्रात मान्सून लांबणार! पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी*
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नसून, येत्या चार दिवसांत राज्यातील पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. मान्सूनचा मुक्काम लांबण्याची चिन्हे असल्याने पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. बातमीचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: * या […]










