आलापल्ली येथे अत्याधुनिक केंद्राचे लोकार्पण; स्थानिक सागवानाच्या मूल्यवर्धनासह रोजगारनिर्मितीवर भर गडचिरोली, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी आलापल्ली येथील ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ महत्त्वपूर्ण ठरेल. या केंद्रामुळे गडचिरोलीतील काष्ठ प्रक्रियेला […]
विदर्भ
अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकास व पायाभूत कामांना गती द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा कमलापूर हत्ती कॅम्प परिसरातील रस्ते, पार्किंगसह विविध विकासकामांची पाहणी ‘सेवा संपृक्त अभियाना’तील ताटीगुडम गावाला रात्री भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद गडचिरोली, दि. २५ (जिमाका) : अहेरी तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व इतर शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध […]
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला सुरक्षेच्या अनुषंगाने महिला दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन
माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणातून सक्षम कुटंुब आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने […]
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रुग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
मुंबई, दि.२४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर […]
वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया
मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात आले आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व […]
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट
मुंबई, दि. २४: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट दिली. यापैकी पहिले प्रकाशन ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे असून, ते इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध […]
लोकरथ न्यूज पोर्टल गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांसाठी वार्ताहरांची नियुक्ती
📰 लोकरथ न्यूज पोर्टल गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांसाठी वार्ताहरांची नियुक्ती लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये तालुका वार्ताहर नेमण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, शासकीय योजना, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, सामाजिक व स्थानिक घडामोडींना प्रभावीपणे व्यासपीठ मिळावे, यासाठी तालुका पातळीवर कार्यक्षम व जबाबदार वार्ताहरांची आवश्यकता आहे. 📌 वार्ताहरांसाठी संधी प्रत्येक […]
सुवर्णसंधी
🌟 सुवर्णसंधी! 🌟 लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची इच्छुकांसाठी एक उत्तम संधी! लोकरथ न्यूज पोर्टलसाठी तालुका प्रतिनिधी व शहर प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आपल्या परिसरातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, शासकीय योजना, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि महत्त्वाच्या घटना यांना आपल्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याची ही संधी आहे. 📢 पदे: – तालुका […]
भामरागडमधील पूरबाधित ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भामरागड तालुक्यात जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज वाटप करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या ५०० पूरबाधित कुटुंबांना दि. २१ ऑगस्ट रोजी खासगी संस्थेमार्फत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. अतिवृष्टीमुळे भामरागड येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी वस्तीत शिरल्याने […]
गडचिरोली पोलीसांची अवैध दारु व्यवसायाविरोधात कठोर कारवाई
पोमकें येलचील हद्दीत चार विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध मोहफुलाची हातभट्टी नष्ट करत एकूण 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन […]










