गडचिरोली

संकटात सापडलेल्या चिमुकल्यासाठी राजे अम्ब्रिशराव महाराजांची तत्पर धाव; उपचारासाठी केली आर्थिक मदत.*

आगीत भाजलेल्या येरमानार टोला येथील दोन वर्षीय अनुषच्या उपचारांचा खर्च भागविण्यासाठी मदतीचा हात; हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबाला मोठा आधार.*

 

📍*अहेरी:-* अहेरी तालुक्यातील येरमाणार टोला येथील अवघ्या दोन वर्षांच्या अनुष साईनाथ वेलादी या चिमुकल्यास आगीत भाजल्याने गंभीर दुखापत झाली. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने अनुषला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती लक्षात घेता रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला गडचिरोली येथे हलविण्याचा सल्ला दिला.

 

आधीच अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या या कुटुंबासमोर चिमुकल्याच्या पुढील उपचारांचा खर्च कसा करायचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने या संकटाच्या प्रसंगी कुटुंबीय चिंतेत होते. अशा कठीण परिस्थितीत अनुषच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्यापर्यंत पोहोचली.

 

ही बाब समजताच राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी तातडीने पुढाकार घेत चिमुकल्या अनुषच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. एका निरागस चिमुकल्यावर आलेल्या संकटाच्या वेळी त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.

 

लहानग्या अनुषला लवकरात लवकर योग्य उपचार मिळून तो सुखरूप बरा व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. संकटाच्या काळात गरजू कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या अडचणीत सहभागी होण्याची सामाजिक बांधिलकी राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी या मदतीतून जपली आहे.

 

एका चिमुकल्याच्या उपचारासाठी वेळीच मिळालेली ही आर्थिक मदत त्याच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरली असून, राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या मदतीबद्दल कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.