ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

भाग्यश्रीताई आत्राम यांनी सुप्रियाताई सुळे यांची घेतली सदिच्छा भेट; नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे अभिनंदन

 

मुंबई येथे भाग्यश्रीताई आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छा भेट घेतली.

 

यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील हे उपस्थित होते. निवडणुकीतील विजयाबद्दल भाग्यश्रीताई आत्राम यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा व संवाद झाला.