कॅन्सरग्रस्त सिकदार कुटुंबाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांचा आर्थिक मदतीचा हात आजारपणाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाला दिला आधार
मुलचेरा (श्रीनगर) प्रतिनिधी : मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या श्रीनगर येथील श्री. खागण खरोद सिकदार हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या पुढील उपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना मिळाली.
ही बाब समजताच राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जपत सिकदार कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यांनी आर्थिक मदत पाठवून दिली असून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मदत सिकदार कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात आली.
आजारपणामुळे संकटात सापडलेल्या सिकदार कुटुंबाला या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असून, कठीण प्रसंगी मिळालेल्या या आधाराबद्दल कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपसरपंच तपन मल्लिक, पोलीस पाटील, आशा मजूमदार, शंकर बनिक, सपन बिस्वास, श्रीनेबश मल्लिक, पोबित्र सरकार, किशोर मल्लिक, पारितोष बिस्वास व सुबल गांगुली उपस्थित होते.
गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाण्याची राजे अम्ब्रीशराव महाराज यांची सामाजिक बांधिलकी या मदतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





