कुरखेडा,

गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन तसेच श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त वतीने अमलीजन्य पदार्थांविरोधी जनजागृती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन समाजात अमलीजन्य पदार्थांविरुद्ध जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, अमलीजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी व जबाबदार जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प करत जनजागृतीची शपथ घेतली.
यावेळी शाळा समिती सदस्य चांगोदेव फाये, प्रा. नागेश्वर फाये, प्रा. प्रदीप पाटणकर, प्रा. विनोद नागपूरकर, शिक्षकवृंद, पोलीस कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून अमलीजन्य पदार्थांविरोधी संकल्प रॅली काढली. यावेळी व्यसनमुक्तीचे संदेश देत नागरिकांना अमलीजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.





