गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

राष्ट्रीय दर्जाच्या NQAS मूल्यांकनात गडचिरोलीची उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन

दुर्गम भागातील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल; आता राष्ट्रीय मानांकनाकडे वाटचाल गडचिरोली, दि. २२ (जिमाका): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS – National Quality Assurance Standards) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, १ ग्रामीण […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ* *आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन*

अहेरी : समाधान शिबिर हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी नोंदणी करावी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’चा आढावा गडचिरोली, दि. २२ जुलै (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक (Agristack) प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा […]