गडचिरोलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जमीन मंजूर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाने मार्ग मोकळा गडचिरोली, दि. 3 जुलै : गडचिरोली नगर परिषदेमार्फत अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली येथील सर्व्हे क्रमांक ८४ मधील २.०४ हेक्टर शासकीय जमीन भोगवट्याने उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र […]
Day: September 24, 2026
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे आर्थिक कवच*
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे आर्थिक कवच दिवसेंदिवस बदलत असलेले हवामान शेतीसाठी जोखीमीचे ठरत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे आणि शेती उत्पादनातील सातत्य अबाधित राहावे, या उद्देशाने राज्य शासनाने खरीप […]
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत
आर्थिक साक्षरता व सामाजिक सुरक्षा योजनांच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम गडचिरोली, दि. : आर्थिक साक्षरतेबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांबाबत प्रभावी जनजागृती केल्यास नागरिकांना संकटाच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळू शकतो, याचा प्रत्यय गडचिरोली तालुक्यात आला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या लाभार्थ्याच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत प्रदान […]
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! रोहिती कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम आता रॉयल्टीमुक्त; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! रोहिती कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम आता रॉयल्टीमुक्त; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि शेती विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहिती (शेतीसाठी आवश्यक) कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम यावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली […]
वयोवृद्ध शेरेंगेबाई आजही जपत आहेत आदिवासी परंपरा; टोरीच्या बियांपासून घरगुती तेल तयार करण्याची अनोखी परंपरा जिवंत
वयोवृद्ध शेरेंगेबाई आजही जपत आहेत आदिवासी परंपरा; टोरीच्या बियांपासून घरगुती तेल तयार करण्याची अनोखी परंपरा जिवंत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील देवदा या आदिवासीबहुल गावात आजही निसर्गाशी एकरूप झालेली पारंपरिक जीवनशैली पाहायला मिळते. आधुनिक युगात अनेक पारंपरिक प्रथा व ज्ञान हरवत असताना, वयोवृद्ध शेरेंगेबाई दुलसा तिम्मा या आपल्या पूर्वजांकडून मिळालेली आदिवासी परंपरा आजही तितक्याच जिद्दीने जपत […]
जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.३: हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवन येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार […]
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे
मुंबई, दि.३ : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा परिषदेमधील सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील सहाय्यक […]







