सिरोंचा : सिरोंचा शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक या प्रमुख मार्गाची अत्यंत खराब अवस्था झाल्याने नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार आणि इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेत रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या विकासासाठी […]
Day: July 6, 2026
भाजप पदाधिकाऱ्यांकडून अहेरीच्या नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हेमंत चांदेवार यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेसाठी शुभेच्छांचा वर्षाव
अहेरी,: अहेरी उपविभागाचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) श्री. हेमंत चांदेवार यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अहेरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अहेरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन उल्लेखनीय कार्य करेल, […]
अहेरी महिला व बाल रुग्णालयाच्या समस्यांची आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल; विशेष पथक अहेरीत दाखल
अहेरी, प्रतिनिधी :अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, रिक्त पदे आणि विस्कळीत झालेल्या आरोग्य सेवेच्या प्रश्नाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानंतर अवघ्या काही तासांत आरोग्य विभागाचे विशेष पथक अहेरी येथे दाखल झाले असून, रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील विधानभवनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष […]
अमली पदार्थांविरोधी जनजागृती रॅली
कुरखेडा, गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन तसेच श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त वतीने अमलीजन्य पदार्थांविरोधी जनजागृती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन समाजात अमलीजन्य पदार्थांविरुद्ध जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, अमलीजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी व जबाबदार […]
कॅन्सरच्या धोक्यामुळे मुलचेरा तालुक्यात मथुरानगरमध्ये खराविक्री बंद
मुलचेरा, : तंबाखू आणि खरा सेवनामुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मथुरानगर येथील ग्रामस्थांनी गावात ‘खरा’ आणि सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या गावात गेल्या १२ वर्षांपासून अवैध दारूविक्रीसुद्धा पूर्णपणे बंद असून, आता व्यसनमुक्तीच्या दिशेने गावाने मोठे पाऊल टाकले आहे. […]
५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे एआयसीटीईचा निर्णय, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील सर्वाधिक महाविद्यालये
देशभरातील तब्बल ५८ इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने ती कायमची बंद करण्याचा निर्णय ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालये बंद होण्याच्या या यादीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये अव्वलस्थानी आहेत. बंद करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १२ आणि उत्तर प्रदेशातील १२ महाविद्यालयांचा समावेश […]
सिरोंच्यातील विश्वासाचे नाव – गणेश किराणा अँड जनरल स्टोर गुणवत्ता, विश्वास आणि आपुलकीच्या बळावर ग्राहकांच्या मनात निर्माण केले वेगळे स्थान
सिरोंचा प्रतिनिधी : सिरोंचा शहरातील पटवारी कॉलनी रोड परिसरात २०१६ पासून सातत्याने ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असलेले गणेश किराणा अँड जनरल स्टोर आज शहरातील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी, युवक आणि कुटुंबीयांचे विश्वासाचे व आवडते दुकान म्हणून ओळखले जात आहे. उत्कृष्ट दर्जा, योग्य दर, ग्राहकाभिमुख सेवा आणि प्रेमळ वागणूक या गुणांच्या जोरावर या दुकानाने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख […]







