पटसंख्येअभावी शाळा बंद झाल्याने १४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; चार किलोमीटर अंतरावरील शाळेत जाणे धोकादायक असल्याने पालक संतप्त सिरोंचा | प्रतिनिधी सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नडीकुडा केंद्रातील गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागील वर्षापासून पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने बंद केल्याने गावातील विद्यार्थ्यांसमोर गंभीर शैक्षणिक संकट निर्माण झाले आहे. शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले असून […]
Day: September 24, 2026
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप
कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे प्रशिक्षणासह ३० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना लाभ गडचिरोली, दि. १० : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण व सुधारित धान बियाणे वितरण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी […]
कर्जमाफीतील ‘५० हजारांची अट’ रद्द; आता २ लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई, दि. १० : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आली असून, आता अशा पात्र शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री […]
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न ६० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड
*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न* *६० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड* गडचिरोली, दि. १० (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजक मेळावा शुक्रवार, दि. […]
महाराष्ट्र हरित अभियानांतर्गत पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण; नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन
वनसंरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्यावर भर – उपवनसंरक्षक दिपाली तलमले गडचिरोली, दि. १० जुलै (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र हरित अभियान २०२६’ अंतर्गत वन विभागाच्या आल्लापल्ली वनविभागातील पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तसेच त्यांच्या […]
विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली, दि. १० : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक पोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेदरम्यान काही नागरिकांनी तिघांना डांबून ठेवले होते, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केले आहे. दि. ९ जुलै रोजी […]
वैशाली मेकओवर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीचा तृतीय बॅच प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न
सिरोंचा : वैशाली मेकओवर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी यांच्या तृतीय बॅचच्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात अकॅडमीतून मेकअप व ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीच्या संचालिका वैशाली मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार, श्रीजा भंडारी (शिक्षिका) […]
सिरोंचा नगरपंचायतीकडून सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन; १५ लाखांच्या खासदार निधीतून साकार होणार ज्ञानमंदिर
सिरोंचा | सिरोंचा शहरातील नागरिकांना दर्जेदार वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपंचायत सिरोंचा यांच्या पुढाकारातून सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. बुधवार, दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पदमा सतीश भोगे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन, नारळ अर्पण व फित कापून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. […]








