मुलचेरा :- महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी मौजा मथुरानगर (ता. मुलचेरा) येथे कृषीदिन कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैविक शेती तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. […]


