ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या तातडीने सोडवा; राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मागणी*

Views: 12,342  सिरोंचा: सिरोंचा तालुक्यातील शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन १ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आले. निवेदनातील मुख्य मागण्या: • शेतकरी कर्जमाफी आणि मदत: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि […]

इतर

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले; सहा जण प्रवासात!,SDRF आणि ITBP कडून युद्धपातळीवर बचावकार्य

Views: 6,784चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धाम येथून परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा जोशीमठ परिसरात अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘ट्रान्स भारत’ कंपनीचे हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्रधाराकडे जात असताना चाई गावाजवळील लष्करी छावणी परिसरात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह एकूण सहा जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल […]

महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मनमानी कारभाराविरोधात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाचे इंदापुरात बेमुदत धरणे आंदोलन!

Views: 9,098इंदापूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदापूर शाखेतील कर्ज व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा तसेच निवृत्ती वेतनातून नियमबाह्य कपात होत असल्याचा आरोप करत वडापुरी येथील दिव्यांग ज्येष्ठ नागरिक भगवान अनंता पासगे यांनी 30 ऑक्टोबरपासून बँकेच्या प्रवेशद्वारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्ज व्यवहारांची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, कपातीचा तपशील स्पष्ट करावा आणि अतिरिक्त वसुलीची रक्कम परत […]

महाराष्ट्र

‘तू मला भेटायला का येत नाहीस? तू माझ्या जवळ असायला पाहिजेस,’ म्हणत महिला सुरक्षारक्षकाचा हात पकडला; दारू पार्टीसाठीही दबाव, कोल्हापुरात खळबळ

Views: 4,591 कोल्हापूर : कोल्हापूरच्या रंकाळा एसटी डेपोत कार्यरत असलेल्या महिला सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘तू मला भेटायला का येत नाहीस? तू माझ्या जवळ असायला पाहिजेस,’ असे म्हणत एका व्यक्तीने महिला सुरक्षारक्षकाचा हात पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दारू पार्टीची व्यवस्था करण्यासाठी दबाव टाकणे, वारंवार फोन करून बाहेर भेटण्याचा आग्रह […]

महाराष्ट्र

मडगावमध्ये पोलिसांवर हल्ला; अटकेपासून पळण्याच्या प्रयत्नात कॉन्स्टेबलला दगडाने मारहाण, 28 वर्षीय तरुणाला अटक

Views: 6,816 मडगाव : पोलिसांच्या ताब्यात जाण्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात एका 28 वर्षीय तरुणाने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करून त्याला दगडाने जखमी केल्याची घटना मडगावमध्ये घडली आहे. या प्रकरणी मडगाव टाऊन पोलिसांनी समीर खान (वय 28, मूळ रा. भोपाळ) याला अटक केली आहे. ही घटना आकें येथील केआरसी रेल्वे स्थानकाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव […]

क्रीडा

IND vs NZ 4th T20 : ग्लेन फिलिप्सचे वादळी शतक; ब्रेसवेलचे अर्धशतक ठरले निर्णायक, भारताचा 87 धावांनी पराभव

Views: 9,107ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडने दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला 87 धावांनी पराभूत केले. ग्लेन फिलिप्सच्या आक्रमक शतकामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 259 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भारताचा डाव 20 षटकांत 9 बाद 172 धावांवर थांबला. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी

Views: 6,870बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी मुंबई | १ नोव्हेंबर २०२६ महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा मूलभूत वस्तू संच देण्याच्या योजनेला शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

Views: 4,367दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/ ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ; ७,५०० कोटींच्या निधीला मंजुरी मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५ […]

महाराष्ट्र

उजनी धरणावरील डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; ‘पाणी आणि वीज वापरणारे प्रकल्प नकोत’; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक

Views: 9,892सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर प्रकल्पांवरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पांमुळे पाणी आणि विजेवर मोठा ताण पडण्याची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला आहे. जनतेच्या इच्छेविरोधात कोणताही प्रकल्प लादण्याचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*असरअल्ली पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचे उत्साहात आयोजन; सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती*

Views: 2,377असरअल्ली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर, असरअल्ली येथील पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ (एकता धावण रॅली) चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लावण्याचा […]