गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्याशी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांची भेट

अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्याशी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांची भेट

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणावर सविस्तर चर्चा.

गडचिरोली:- भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, अल्पसंख्याक समाजाशी अधिक प्रभावी संवाद, तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांचा जिल्ह्यात अधिक व्यापक विस्तार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावी, असे मार्गदर्शन केले. अल्पसंख्याक समाजातील युवकांना पक्षाशी जोडणे, सामाजिक सलोखा मजबूत करणे आणि सेवा व विकासाच्या माध्यमातून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक उपक्रमांची माहिती राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. आगामी काळात अल्पसंख्याक मोर्चाचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम, जनसंपर्क अभियान आणि कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली.

ही भेट अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून, राष्ट्रीय नेतृत्वाकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्याला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात संघटन अधिक सक्षम करून पक्षाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.