गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चातगाव आरोग्य उपकेंद्राला मध्यरात्री अचानक भेट

रात्रीच्या आरोग्य सेवेची तत्परता, औषधसाठा, मलेरिया निदान किट्स व नोंदींची केली प्रत्यक्ष पडताळणी गडचिरोली, : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी बुधवारी मध्यरात्री गडचिरोलीजवळील चातगाव आरोग्य उपकेंद्राला कोणतीही पूर्वसूचना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

युरिया व डीएपी खतटंचाईविरोधात अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ‘हल्लाबोल’ आंदोलन

अहेरी, दि. ९ : खरीप हंगाम २०२६–२७ मध्ये शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अहेरी येथे सोमवारी दुपारी १२.०० वाजता ‘हल्लाबोल’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सीनेट सदस्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मुलचेरात भव्य कृषी मेळावा; शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन आणि विविध साहित्याचे वाटप

मुलचेरा, दि. ९ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या समाजाभिमुख ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत आणि ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’ योजनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशन मुलचेरा यांच्या वतीने गुरुवारी (दि. ९ जुलै) मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३.३० या वेळेत पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, शासकीय योजना, कृषी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पोलीस विभागाच्या पुढाकाराने भव्य कृषी मेळावा; शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभाग एकाच छताखाली

मुलचेरा, दि. ९ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशन, मुलचेरा यांच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी मेळाव्याला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून दिल्या. मेळाव्यात कृषी, महसूल, आधार केंद्र, आरोग्य, पशुसंवर्धन, […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मातोश्री वृद्धाश्रमात ‘मेरा युवा भारत’ची पाच दिवसीय सेवा मोहीम उत्साहात संपन्न

विद्यार्थिनींच्या सेवाभावी उपक्रमांनी वृद्धांना दिला आनंदाचा सहवास; सामाजिक बांधिलकीमचा आदर्श गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : युवा पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करताना ज्येष्ठ नागरिकांना भावनिक आधार मिळावा, या उद्देशाने ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat), गडचिरोली यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात दि. २५ ते २९ जून २०२६ या कालावधीत पाच दिवसीय सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले. विविध […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला बळ; तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

गडचिरोली: राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ देत महसूल प्रशासनाने तत्परतेने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले. अहेरी तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते बुधवारी (८ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सिरोंचा:-“ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेचे ऋण समाजाप्रती सेवा करून फेडूया,” या उदात्त भावनेतून राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथील सन २०००–२००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या तसेच शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराला यश; गडचिरोलीतील ६२ बालकांवर मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

गडचिरोलीत ३४६ बालकांच्या तपासणीनंतर ६२ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र; प्रवास, निवास, उपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च मोफत गडचिरोली, दि. ८ जुलै (जिमाका) : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त बालकांसाठी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या विशेष पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

परवान्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यात डोमिसाईल अनिवार्य

परवान्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यात डोमिसाईल अनिवार्य वाहनचालक परवान्यासाठी नवीन नियमावली; महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई, दि. ७ जुलै : महाराष्ट्रात वाहनचालक परवाना (Driving Licence) मिळविण्याच्या प्रक्रियेत राज्य शासनाने महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्ट २०२६ पासून वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी महाराष्ट्र अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हास्तरीय ६५ वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा मुलचेरा येथे १६ व १७ जुलैला