सिरोंचा शहरात आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे किरण भाऊ पेंटर आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या किरण भाऊंनी लहान वयातच घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्षमय प्रवास सुरू केला. शिकण्याची प्रचंड आवड असतानाही परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणासोबत कामाची वाट निवडावी लागली. पेंटिंगचे काम शिकण्यासाठी ते आलापल्ली […]
गडचिरोली
डिजिटल कृषी सेवेचा नवा अध्याय! शेतकऱ्यांशी थेट संवादासाठी मुलचेरा कृषी विभागाचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, अनुदान, शासकीय योजना आणि तांत्रिक मार्गदर्शन आता थेट मोबाईलवर; क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणांत चॅनेलशी जोडा
मुलचेरा, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती वेळेवर, विश्वासार्ह आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुलचेरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डिजिटल कृषी सेवेचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. कृषी विभागाचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, रोग व किडींचे नियंत्रण, अनुदान, […]
रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून नगरसेवक आक्रमक; सिरोंच्यात तातडीच्या दुरुस्तीची मागणी
सिरोंचा : सिरोंचा शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक या प्रमुख मार्गाची अत्यंत खराब अवस्था झाल्याने नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार आणि इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेत रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या विकासासाठी […]
भाजप पदाधिकाऱ्यांकडून अहेरीच्या नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हेमंत चांदेवार यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेसाठी शुभेच्छांचा वर्षाव
अहेरी,: अहेरी उपविभागाचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) श्री. हेमंत चांदेवार यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अहेरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अहेरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन उल्लेखनीय कार्य करेल, […]
शहरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा तालुका प्रशासन व मुख्याधिकारी ॲक्शन मोडमध्ये
धानोरा तालुका प्रतिनिधी शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे धानोरा वासियाना रस्त्यावरून चालणे आणि दुचाकी चारचाकी वाहने कठीण झाले होते, त्या समस्येचा खेळ अखेर नगरपंचायत प्रशासनाने एकाच झटक्यात खल्लास केला आहे. शहराच्या सौंदर्याला आणि सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या या विळख्यातून मुख्य बाजारपेठेला मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने शुक्रवारी अत्यंत धडक पाऊल उचलले. थेट रस्त्यावर उतरून ॲक्शन मोडमध्ये आलेल्या […]
गडचिरोलीत बाल हृदय तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरणार – मुख्यमंत्री
गडचिरोलीत बाल हृदय तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरणार – मुख्यमंत्री ३०० हून अधिक बालकांची 2D Echo तपासणी; गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती गडचिरोली, दि. ५ जुलै (जिमाका) : गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात बालकांसाठी […]
नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; आरमोरीत तालुकास्तरीय प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ
नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; आरमोरीत तालुकास्तरीय प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ आरमोरी : शालेय शिक्षण विभाग तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाला मंगळवारी यशवंत इंग्लिश स्कूल, आरमोरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. इयत्ता दुसरीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण १ ते ३ जुलैदरम्यान तीन दिवस, तर इयत्ता तिसरी […]
आलापल्ली–सिरोंचा मुख्य रस्त्याची दुर्दशा; चिखलामुळे वाहतूक विस्कळीत, नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप
आलापल्ली : आलापल्ली–सिरोंचा या महत्त्वाच्या मुख्य मार्गावरील टेकमपल्ली फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टेकमपल्ली फाट्यावरील संपूर्ण परिसर चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. […]
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे
मुंबई, दि.३ : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा परिषदेमधील सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील सहाय्यक […]
जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. २९ : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीत संबंधित विषयांवरील तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. […]










