गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

१७ ते ३० जुलैदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार; प्रवेश मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पालकांनी १७ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विद्यालयात ऑफलाइन पद्धतीने […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

ग्रामस्थांच्या एकजुटीने घडवला आदर्श; १३ वर्षांपासून दारूमुक्त फुस्की माल गाव

अवैध दारूविक्रीला पूर्णविराम; तंबाखू-खर्र्यावरही बंदी, भांडण-तंटेमुक्त गाव म्हणून परिसरात नवी ओळख मुलचेरा मुलचेरा तालुक्यातील फुस्की माल या छोट्याशा गावाने ग्रामस्थांच्या अभेद्य एकजुटीच्या बळावर समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सुमारे ११० लोकसंख्या असलेल्या या गावात मागील तब्बल १३ वर्षांपासून अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा बसला असून गावाने ‘दारूमुक्त आणि भांडण-तंटेमुक्त गाव’ अशी वेगळी ओळख निर्माण […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंच्यात ‘श्री बद्रकाली टाईल्स’ या नवीन दुकानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

सिरोंचा, प्रतिनिधी : सिरोंचा येथील सागर रेड्डी कॉम्प्लेक्समध्ये ‘श्री बद्रकाली टाईल्स’ या नवीन दुकानाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. *या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक श्री. सतीश भोगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरसेवक श्री. रंजीत नागेश्वर गागापुरवार हे प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते*. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

हरवलेले व चोरीला गेलेले ११ मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश कुरखेडा पोलिसांच्या तांत्रिक तपासातून २ लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत; नागरिकांनी व्यक्त केले समाधान

गडचिरोली गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण तपास आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेले व चोरीला गेलेले एकूण ११ मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित मूळ मालकांना परत सुपूर्द केले. या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क; ४० हजार नागरिकांना मोठा दिलासा

  गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क; ४० हजार नागरिकांना मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; २१,८२४ एकर जमीन ‘वर्ग-१’ होणार, १० हजार घरे नियमितीकरणाच्या मार्गावर मुंबई | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुनर्वसन कायद्यांतर्गत अनेक वर्षांपूर्वी मिळालेल्या जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

चिचोळा येथे खरीप हंगाम महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न पूर्वनियोजनावर भर देत नैसर्गिक शेतीचा प्रसार

गडचिरोली,  : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत भामरागड तालुक्यातील चिचोळा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महिला शेतीशाळेचा पहिला वर्ग १० जुलै रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला. नैसर्गिक शेतीचा प्रसार, हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि खरीप हंगामाचे योग्य नियोजन याबाबत महिला शेतकरी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेमध्ये दशपर्णी अर्काची […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पावसाळ्यात जंगलात रानभाज्यांची रेलचेल; पौष्टिकतेसोबत ग्रामीण भागाला रोजगाराचाही आधार

पावसाळा सुरू होताच गडचिरोली जिल्ह्यातील जंगल, डोंगराळ आणि दुर्गम भाग विविध प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्यांनी बहरून जात आहेत. निसर्गाच्या कुशीत कोणत्याही रासायनिक खतांशिवाय नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टिक, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग ठरतात. याचबरोबर त्यांच्या विक्रीमुळे अनेक कुटुंबांना हंगामी उत्पन्नाचाही आधार मिळत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच अनुभवी आणि जाणकार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे ‘छात्रों की गुंज – शिक्षा बचाओ, देश बचाओ’ विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

आरमोरी   देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे ‘छात्रों की गुंज – शिक्षा बचाओ, देश बचाओ’ या विद्यार्थी जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, विद्यार्थ्यांचे हक्क, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंचा तालुक्यातील वडदाम जीवाश्म उद्यान : लाखो वर्षांचा इतिहास जपणारा महाराष्ट्राचा अनमोल वैज्ञानिक ठेवा

सिरोंचा तालुक्यातील वडदाम जीवाश्म उद्यान : लाखो वर्षांचा इतिहास जपणारा महाराष्ट्राचा अनमोल वैज्ञानिक ठेवा  | लोकरथ न्यूज | सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वसलेले वडदाम जीवाश्म उद्यान (Waddham Fossil Park) हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या डायनासोर, प्राचीन मासे, वृक्ष आणि इतर सजीवांच्या जीवाश्मांचा अनमोल […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्याशी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांची भेट

अल्पसंख्याक मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्याशी जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांची भेट अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणावर सविस्तर चर्चा. गडचिरोली:- भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालजी सिद्धीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, […]